चालू प्रकल्प कसा तपासायचा
घर घेण्यापूर्वी प्रकल्प MahaRERA मध्ये नोंदणीकृत आहे का आणि तो चालू आहे का ते स्वतः तपासा — पाच सोप्या पायऱ्या.
RERA नोंदणी किंवा प्रकल्पाची माहिती दिसणे म्हणजे कर्जमंजुरीची हमी नाही. बँकेची मंजुरी अर्जदार, मालमत्ता आणि बँकेच्या तपासणीवर अवलंबून असते.
- 1
MahaRERA पोर्टल उघडा
खालील बटणावरून अधिकृत पोर्टलवर जा आणि "Registered Projects" मध्ये प्रकल्प शोधा.
- 2
जिल्हा निवडा
जिल्हा निवडून search करा: पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर.
- 3
प्रकल्प उघडा व पूर्णत्व दिनांक पाहा
प्रत्येक प्रकल्पाचा पूर्णत्व दिनांक (completion date) दिसतो. दिनांक पुढचा असेल तर प्रकल्प "चालू" आहे; दिनांक होऊन गेला असेल तर प्रकल्प "संपलेला" असू शकतो किंवा मुदतवाढ घेतलेली असू शकते — प्रकल्पाची स्थिती तपासा.
- 4
क्रमांक व बिल्डरचे नाव जुळवा
बिल्डर/जाहिरातीत दिलेला RERA क्रमांक आणि बिल्डरचे नाव पोर्टलवरील माहितीशी जुळते का ते पाहा. क्रमांक खाली दिलेल्या checker ने तपासता येतो.
- 5
बँकेला विचारा
तुमच्या बँकेकडे हा प्रकल्प कर्जासाठी मान्य आहे का ते लेखी विचारा. मान्यता बँकेनुसार ठरते. कर्ज देणाऱ्या संस्थांची सर्वसाधारण यादी गृहकर्ज पानावर आहे — ती प्रकल्प-मंजुरीची यादी नाही.
पश्चिम महाराष्ट्रात किती प्रकल्पांना MahaRERA मंजुरी?
घर किंवा प्लॉट घेण्यापूर्वी प्रकल्प MahaRERA मध्ये नोंदणीकृत आहे का ते तपासा. खाली जिल्हानिहाय नवीन मंजूर प्रकल्पांची तुलना आहे.
जिल्ह्यांची तुलना
कोणत्याही जिल्ह्याच्या कार्डवर क्लिक करा, त्याची माहिती इथे दिसेल.
RERA क्रमांक तपासा
प्रकल्प क्रमांक टाका (उदा. P52100012345 किंवा PR1150002601102). तो कॉपी होऊन MahaRERA पोर्टल उघडेल; तिथे Search मध्ये paste करा.
पोर्टलवर काय जुळवायचे
- प्रकल्पाचे नाव — जाहिरात/करारातील नावाशी जुळते का
- बिल्डर (promoter) — नाव तेच आहे का
- नोंदणी व पूर्णत्व तारीख — प्रकल्प चालू आहे की संपलेला
स्रोत: MahaRERA आकडेवारी (FY 2023-24 आणि FY 2025-26 साठी नवीन मंजूर प्रकल्प). सांगली आणि सोलापूरचे २०२५-२६ चे जिल्हा-आकडे उपलब्ध झाले नाहीत. अधिकृत यादी: maharera.maharashtra.gov.in. शेवटचे अपडेट: 2026-10.